ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

हृदय पिळवटून टाकणारी घटना; पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad – पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग (Fire) लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

आज (30 ऑगस्ट) पहाटे चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागली. त्यावेळी या दुकानात चौधरी कुटुंबातील चार जण वास्तव्यास होते. तर दुकानाला लागलेल्या आगीत या चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सचिन चौधरी, चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, भावेश चौधरी अशी आगीत मृत पावलेल्यांची नावं आहेत. तसंच एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी आग नियंत्रणात आणली असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. तसंच ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये