ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“नुसता मुखवटा लावून…”, राऊतांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई | Aditya Thackeray Reaction On Sanjay Raut Bail – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्याप्रकरणी ते अटक होते. त्यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांचे प्रत्येकवेळी अर्ज फेटाळण्यात आले होते. तसंच आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कार्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच संजय राऊत यांच्या परतण्यानं शिवसेनेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यादरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “संजय राऊतांचं कौतुक करणं गरजेचं आहे. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेतच पण ते बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. नुसता मुखवटा लावून फिरत नाहीत. त्यांच्यावर देखील दबावतंत्र वापरलं तरी ते पळून गेले नाहीत, त्यांनी गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे जनतेसमोर आलं आहे.”

“जे कोणी सत्तेच्या विरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होत आहे उद्या जनतेवर कारवाई होऊ शकते. ही धोक्याची घंटा आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये