क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

BCCIचा मोठा निर्णय! World Cup चा प्रश्न मार्गी, आता वेळापत्रकात कोणताही बदल नाही

मुंबई : (World Cup 2023 Schedule) भारतामधील होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा बदल होणार, अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे बीसीसीआय नामुष्कीची वेळ येऊ शकली असती. पण आता या World Cup Schedule मध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आता समोर आले आहे. हा प्रश्न आता कसा मिटला आहे, हेदेखील आता समोर आले आहे.

हैदराबादच्या मैदानात ९ ऑक्टोबरला न्यूझीलंड आणि नेटरलँड्स यांच्यात सामना होणार आहे, तर बदललेल्या वेळापत्रकानुसार आता १० ऑक्टोबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत होणार आहे. सलग दोन दिवसांमध्ये दोन सामने कसे खेळवायचे, असा प्रश्न हैदराबादच्या क्रिकेट संघटनेने विचारला होता. त्यासाठी या संघटनेने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल करायला हवा, असे बीसीसीआयला सांगितले होते.

हैदराबादच्या क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला सांगितले होते की, ” या दोन सामन्यांचा सुरक्षेचा प्रश्न सुटेल, मैदानाचे काय. बीसीसीआयने वर्ल्ड कप कार्यक्रमात बदल न करण्याचे ठरवल्यास राज्यातून अतिरिक्त पोलिस मागवण्याचा विचार झाला आहे. त्याचबरोबर खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ९ ऑक्टोबरला न्यूझीलंड-नेदरलँड्स लढत असताना सामन्यापूर्वीचा सराव पाकिस्तान आणि श्रीलंका संघ कसा करू शकतील, अशी विचारणा होत आहे. “

“वर्ल्ड कप स्पर्धा कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. हैदराबाद येथील सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेथील प्रश्न सोडवण्यात येतील. सामन्यांच्या तारखा बदलण्याचा निर्णय केवळ बीसीसीआय घेत नाही, त्यात आयसीसी आणि सामने खेळणाऱ्या संघांचाही सहभाग असतो,” हैदराबादमधील सामन्याची जबाबदारी घेणाऱ्या राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये