ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पुणे शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच; ‘या’ कारणामुळे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

पुणे | Pune News – सध्या सर्वांना आतुरता लागली आहे ते गणेशोत्सवाची. संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यात पुणे (Pune) शहरातील गणेशोत्सव हा सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्यामुळे फक्त देशातूनच नाही तर विदेशातून देखील पर्यटक पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी पुण्यात दहशतवादी सापडले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरावर 24 तास वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे पोलिसांनी शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पोलिसांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातील 2,600 गणेश मंडळांना मंडप परिसरात सीसीटीव्ही बसवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता शहरावर 24 तास वॉच राहणार आहे.

पुण्यातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड आणि लष्कर भागात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पोलिसांनी गणेश मंडळांसोबतच या परिसरात असणाऱ्या व्यावसायिकांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, 3 जुलै रोजी पुण्यात एनआयएच्या मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांच्या यादीतील मोहम्मद युनूस साकी आणि इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. या दोघांचा इसिसशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये