ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीहिस्टाॅरिकल

…म्हणून मी ‘औरंगजेबजी’ म्हणालो; बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : (Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना रोखठोक मधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर हल्लाबोल केला. बावनकुळे यांनी औरंगजेबचा, ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांसह राऊत यांनी बावनकुळे त्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजेंच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात रान उठवत आहेत. औरंगजेब (Aurangjeb) क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या (NCP) एका आमदारास याच वेळी झाला व औरंगजेबजी हे सन्माननीय आहेत, असं बावनकुळे यांना पटलं. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास आहे, असे राऊत म्हणाले. राऊतांच्या रोखठोकवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“क्रूरकर्मा, पापी औरंग्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना कसा आदरणीय आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेणारा औरंग्या किती नीच, क्रूर, दुष्ट, अमानुष आहे. तरी आव्हाड औरंग्याला शुद्धतेचे प्रमाणपत्र देतात. याची कीव आली म्हणूनच मी पापी औरंग्या आव्हाडांना किती प्रिय, आपुलकीचा व श्रद्धास्थानी आहे हे सांगण्यासाठी, औरंग्या आव्हाडांसाठी ‘औरंगजेबजी ‘ आहे, असे मी उपरोधाने म्हणालो. उपरोधही समजू नये, हे अनाकलनीय व दुर्दैवी आहे. त्या औरंग्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही. हे पुन्हा सांगतो आणि आयुष्यभर सांगेन,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट कले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये