ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपचा डोळा, मुख्यमंत्री शिंदेच्या हातून मुलाची जागा निसटणार?

कल्याण : (Devendra Fadnavis on Eknath Shinde) भारतीय जनता पार्टी… अत्यंत महत्वाकांक्षी पक्ष… लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा बहुमताने पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आसुसले आहेत. परंतु त्यासाठी भाजपच्या काही मित्रपक्षांना जागांच्या बाबतीत त्याग करावा लागू शकतो, अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या या वृत्तीचा अनुभव आता त्यांच्या मित्रपक्षाला येणार का? अशी चर्चा आहे. याची सुरुवात थेट मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामधून होऊ शकते, अशीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राच्या मतदारसंघाची रेकी करण्याची मालिकाच सुरु केलीय. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या हातून निसटणार का? असा सवाल विचारला जातोय. विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज आहेत. पण भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या वाटेत काटे पेरले आहेत. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागलेली आहे. मात्र अजून जागा वाटप झालेलं नसल्याने कल्याण लोकसभेला उमेदवार भाजपचा की शिवसेना शिंदे गटाचा असणार ही उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळेच कल्याण लोकसभेत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) असे चित्र दिसून येऊ शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदुत्ववादी संघटनांची मजबूत पकड असलेला आणि दिवंगत नेते राम कापसेंच्या विजयाचा इतिहास सांगत भाजप या मतदारसंघावर हक्क सांगतोय. कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे झालेले दौरे आणि भाजप आमदारांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे हा दावा प्रबळ वाटतोय. राम कापसे हे १९७८ साली कल्याण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. १९८० आणि १९८५ मध्ये त्यांनी आमदारकी मिळवली.

नोव्हेंबर १९८९ मध्ये (तत्कालीन) ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळवत काँग्रेसचे शांताराम घोलपांचा पराभव करून विजयी १९९१ साली राम कापसे दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले. परंतु, राम कापसे हेच या मतदारसंघातले आतापर्यंतचे अखेरचे भाजपचे खासदार ठरतात…कारण पुढे आनंद दिघेंच्या वाढत्या वर्चस्वामुळे १९९६ साली ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये