ताज्या बातम्यारणधुमाळी

“कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे…”, मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई | Gajanan Kale On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांचे प्रत्येकवेळी अर्ज फेटाळण्यात आले होते. तसंच आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कार्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच संजय राऊत यांच्या परतण्यानं शिवसेनेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यादरम्यान, राऊतांवर मनसेकडून खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

संजय राऊतांची सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आल्या होत्या. यावरून मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “काल पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता”, असं गजानन काळेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“सूर बदले बदले है जनाब के…राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील. लवंडे जोमात. मातोश्री कोमात”, असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांना ‘राजकारणातील अलका कुबल’ असा उल्लेख करत गजानन काळेंनी खोचक टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये