ताज्या बातम्यारणधुमाळी

शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकर म्हणाले, “मी यासाठीच थांबलो होतो की…”

मुंबई | Gajanan Kirtikar – खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची जामिनीवर सुटका झाल्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण होतं. मात्र, ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसला आहे. खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. काल (11 नोव्हेंबर) संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी किर्तीकर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाला मोठा फायदा होईल, असं म्हटलं आहे. यादरम्यान, गजानन किर्तीकर यांनी शिंंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे.

यावेळी गजानन किर्तीकर म्हणाले की, “एका योग्य मार्गानं शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थानं ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेते आहेत. या आपुलकीनं मी संघटनेत प्रवेश केला.”

“आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते 12 खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही”, असंही किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “समेट करा असंही आम्ही सांगितलं. दोन्ही शिवसेनांचा दसरा मेळावा एवढ्या भव्यदिव्य ताकदीनं झाला. मुंबईत एका दिवशी एवढी ताकद एकवटली. जर या दोन शक्ती एकत्र आल्या, समेट घडला तर शिवसेना किती मोठी होऊ शकेल. या सगळ्याची आम्ही वाट पाहत होतो. पण उद्धव ठाकरेंचं यासंदर्भात कुठलं मत आम्हाला दिसलं नाही. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा प्रवास उद्धव ठाकरेंनी थांबवायला हवा होता. पण ते काही आम्हाला दिसलं नाही”, असंही गजानन किर्तीकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये