ताज्या बातम्यामनोरंजन

‘हा’ मराठमोळा अभिनेता लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झळकणार प्रमुख भूमिकेत

मुंबई | Gashmeer Mahajani – मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक होताना दिसतं. त्यात आता अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अभिनेता गश्मीर महाजनीनं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नुकताच तो ‘झलक दिखला जा’या लोकप्रिय शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये त्यानं आपल्या नृत्य कौशल्याची छाप पाडत तो फिनाले पर्यंत पोहोचला आहे. त्याच्या डान्सचं अनेक दिग्गजांनी कौतुक देखील केलं आहे. तसंच आता तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘छोरी 2’ या चित्रपटातून गश्मीर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचाबरोबर (Nushrat Bharucha) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट एक स्त्रीप्रधान आणि सस्पेन्स चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली प्रदर्शित झाला होता. त्या पहिल्या भागामध्ये कोणत्याही अभिनेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका नव्हती. तसंच आता दुसऱ्या भागात गश्मीर एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे गश्मीरचे चाहते त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये