ताज्या बातम्यामहाराष्ट्रहिस्टाॅरिकल

”ही वाघनखं शिवाजी महाराजांच्या वापरातील नाहीत”; इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला इंग्लंडमधून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत आहेत. पंरतु या वाघनखांच्या ऐतिहासिक सत्यतेबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतलाय. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियममधून महाराष्ट्रात आणली जात असलेली वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील आहेत, असं शासन म्हणत आहे. परंतु ते खरं नसल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या १६ नोव्हेंबर रोजी इग्लंडवरुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात घेऊन येणार आहेत. केवळ तीन वर्षे ही वाघनखं महाराष्ट्रात असतील. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखं इंग्लंडला माघारी पाठवण्यात येतील. इंग्लंडवरुन येत असलेल्या वाघनखांबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले की, ही वाघनखं अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली नाहीत. कारण अफझल खान वधाच्या वेळेला जी वाघनखं वापरली त्याविषयीची स्पष्टता आहे. १९१९ पर्यंत ही वाघनखं सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याच्या नोंदीदेखील आहेत.

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधून तीन वर्षांसाठी राज्य शासन जी वाघनखं आणत आहे ती शिवछत्रपतींनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेलं नाहीत. कारण १९१९ पर्यंत इथं वाघनखं असतील आणि त्याची छायाचित्र, नोंदी असतील तर त्याच्याही अगोदरच म्यूझियमध्ये गेलेली वाघनखं ती असू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये