Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

मुंबईतील 28 पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांचे आदेश; मविआ काळात साईड पोस्ट झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत

मुंबई : Mumbia Police – मुंबई पोलीसमध्ये आज तब्बल २८ बृहन्मुंबई पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी त्याबाबत आदेश दिले आहेत. अनेक अधिकारी नियुक्त्यांच्या प्रातीक्षेत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांच्याशी सलगी असल्याच्या कारणाने मुंबई बाहेर पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांची पोस्टिंग आता पुन्हा मुंबईमध्ये करण्यात आली आहे. मविआ सरकारच्या काळात खंडणी प्रकरणात अनील परब यांची हकालपट्टी करण्यात आली. त्याचवेळी पोलीस उपयुक्त पराग मणेरे, अकबर पठाण, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यांची पोस्टिंग मुंबई बाहेर करण्यात आली होती. मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे अधिकारी भूमिगत झालेले होते.

मात्र, शिंदे – फडणवीस सरकारमध्ये पुन्हा त्यांची मुंबईत बदली केली आहे. त्यामुळे अनेक नवीन नियुक्त होऊ पाहणाऱ्या अधिकार्यांना डावलण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये