ताज्या बातम्यामनोरंजन

72 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून 80 हजारांचा सुवर्णहार लंपास

पुणे | होळीच्या दिवशी देशभरात गुलाल आणि रंगांची उधळण होत असते. होळीचा सण तरुणांच्या विशेष आवडीचा आहे. यादिवशी रंग, पिचकारी आणि पाण्याचे फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून घेऊन मजा करणं प्रत्येकालाच पण, या आनंदाच्या सणात काही स्त्रियांना मनस्ताप सहन करावा लागतो. ठिकठिकाणी रंग खेळण्यासाठी जमलेल्या अनेक स्त्रिया आणि मुलींशी गैरवर्तन होत असते. अशातच पुण्यातून एक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील 80 हजारांचा सुवर्णहार दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

एका 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून चोरट्याने 80 हजारांचा सुवर्णहार हिसकावून नेल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. पसार झालेल्या चोरट्याने त्याच्या चेहऱ्यावर रंग लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत फिर्यादी ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहे.

ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. काही कळायचा आत चोरटा महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये