ताज्या बातम्यारणधुमाळी

“चित्राताई आपल्या नवऱ्याचं…”, ‘ते’ स्क्रीनशाॅट शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | Jitendra Awhad On Chitra Wagh – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ठाण्यातला शो बंद पाडून तिथे झालेल्या गोंधळामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. यातून त्यांना जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे आव्हाडांना दुसऱ्यांदा न्यायालयाकडून जामीन मिळवावा लागला. यादरम्यान, आता विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे (Anant Karmuse) मारहाण प्रकरणाचा दाखला देत त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर आव्हाडांनी एक खुलासा करणारं ट्विट शेअर केलं असून यामध्ये त्यांनी अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशाॅटही शेअर केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता अनंत करमुसे प्रकरणावरून टीका केली जात आहे. मात्र, आव्हाडांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसानं 2016 ते 2020 या काळात माझा पाठलाग केला, ट्विटर-फेसबुकचा वापर करत बदनामी केली, ब्लाॅक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गानं तो मला त्रास देतच राहिला. टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाचं, वडिलांचं किंवा तुमचं अशा प्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं किंवा इतकी वर्ष त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

पुढे आव्हाडांनी भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. “चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारित झालं असतं तर आपण काय केलं असतं? याचं उत्तर कधीतरी द्या. 2016 ते 2020 या काळात त्यानं काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा”, असं आव्हाड म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये