ताज्या बातम्यामनोरंजन

चक्क मीडियासमोरच कश्मीरा शाहनं नवऱ्याला जवळ ओढत केलं किस; म्हणाली, “मी माझ्या पतीला सारखं…”

मुंबई | Kashmira Shah – प्रसिद्ध काॅमेडियन कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. कश्मीरा शाह ही तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती काही दिवसांपूर्वीच राखी सावंतला सपोर्ट करण्यासाठी गेली होती. तसंच तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तर आता कश्मीरा आणि कृष्णाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कश्मीरा कृष्णाला किस करताना दिसत आहे. त्यामुळे कश्मीरा पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

एका पार्टीमध्ये कश्मीरा आणि कृष्णा पोहोचले होते. या पार्टीत ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) फेम प्रियांका चौधरी (Priyanka Chaudhary) देखील होती. या पार्टीमधून बाहेर पडताना कश्मीरानं कृष्णाला किस केल्याचं दिसलं. सोबत तिनं प्रियांकालाही किस केलं. यावरुन कश्मीराला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. याबाबत आता कश्मीरानं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कश्मीरा म्हणाली की, “मला माहिती आहे की, लोकांना असं वाटलं की मी नशेमध्ये होते. मी नशा करुन असं वागत आहे, असं बोलण्यात आलं. पण यामागचं खरं कारण काही वेगळंच होतं.”

“मी खूप लांबचा प्रवास करुन आले होते. मी अमेरिकेमधून खूप दिवसांनी आले होते. त्यानंतर लगेचच मी पार्टीला गेले. तेव्हा माझ्या हातात वाईनचा ग्लास होता. त्यावेळी मी माझ्या पतीला सारखं जवळ ओढत होते. कारण त्याला मी खूप दिवसांनी भेटले होते. मी 3 आठवडे त्याच्यापासून लांब होते. त्यामुळे मी त्याला सगळ्यांसमोरच किस केलं”, असं कश्मीरानं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये