इतरक्राईमताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

Lalit Patil: ललित पाटीलचा नवीन ड्रामा? जेलमधून रूग्णालयात जाण्यासाठी केलं ‘हे’ नाटक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Lalit Patil | ड्रग्स माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्ये ललित पाटीलचे अनेक जुने व्हिडीओ समोर येत आहेत. आताही ललितचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याचा नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

2019 मध्ये ललित पाटीलला अटक झाली होती. त्यावेळी तो येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत होता. तर तुरूंगातून तो नाटक करत रूग्णालयात कसा पोहोचला याबाबतचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये ललित पाटीलचा ड्रामा पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललितच्या पायाला पट्टी बांधल्याचं दिसत आहे. तसंच ललित जिन्यावरून उतरत असताना पडतो. त्यावेळी त्यानं त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं भासवलं होतं. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी औंध रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ललितचा हा व्हिडीओ 2020 मधील आहे.

ललितला अटक केल्यानंतर त्याला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. त्यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्यात ललितनं आजारपणाचं नाटक केलं होतं. त्यानं पोलीस स्टेशनच्या जिन्यावरून उतरताना पडण्याचं नाटक केलं होतं, हे आता उघड झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये