ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवारांच्या बारामतीत मनसेचं इंजिन धावणार? वसंत मोरेंवर दिली मोठी जबाबदारी!

पुणे : (Raj Thackeray On Sharad Pawar) शरद पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभेसाठी मनसेकडून सध्या तयारी करण्यात येत आहे. भाजपनंतर आता मनसेनं पवारांच्या बालेकिल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. जवळपास तीन महिन्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मुडमध्ये आले आहेत. आगामी काळातील निवडणुकीसाठी त्यांच्याकडून आतापासून पक्षाची मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनेसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत आज पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिरतेला संधी म्हणून पहा आणि कामाला लागा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंगा प्रकरणामुळे पक्षापासून थोडं दुर राहिलेल्या आणि पुणे मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा घेतलेले वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा निरीक्षक म्हणून राज ठाकरेंनी जबाबदारी सोपावली आहे.

काही दिवसांपुर्वीच भाजपनंही पवार कुटुंबाला घेरण्यासाठी बारामती लोकसभेवर लक्ष केंद्रीय केल्याचे दिसून आले. आता मनसेनेही आपला पुणे जिल्ह्यातील हुकमी एक्का बाहेर काढला आहे. त्यांचा जनसामान्यात दांडका संपर्क आहे, त्यामुळे मनेसेचं इंजिन पवारांना शह देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज ठाकरेंच्या मागील अनेक सभांमध्ये शरद पवार निशाण्यावर दिसून आले आहेत. त्यामुळे येत्या काळात बारामतीची निवडणुक चुरशीची होणार हे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये