ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीशेत -शिवार

“…नाही तर महाराष्ट्र जळताना दिसेल” शेतकरी नेते तुपकर यांचा सरकारला इशारा..

नागपूर : (Ravikant Tupekar On State Government) शेतमालाला रास्त भाव, नुकसानभरपाई देण्यास राज्या सरकारची टाळाटाळ तसंच पिकविम्याचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांनी ताकद दाखवण्यासाठी 01 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आपली ताकद दाखवून देण्यासाठी सर्व शेतकरी व शेतमजुरांनी आपले पक्ष, झेंडे, बॅनर बाजूला ठेवून यात्रेत सहभागी व्हावा, असं आवाहन केलं. तर केंद्र व राज्य सरकारने रास्त निर्णय घेतले नाहीत तर महाराष्ट्र जळताना दिसेल, असा इशारा देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

आज सात हजार रुपये उत्पादन खर्च असलेल्या सोयाबीनला चार हजार रुपयांत विकावे लागते. कापसाचा खर्च आठ हजार आणि विक्री सात हजार असा आहे. अशीच परिस्‍थिती राहिल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आम्ही अव्वाच्या सव्वा भाव मागत नाही. किमान एका पोत्यावर हजार रुपये तरी शेतकऱ्यांना मिळावे, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची एकजूट आणि आंदोलनामुळे काय मिळू शकते, हे बुलडाणा जिल्ह्याने दाखवून दिले. त्यामुळे सरकारला कसे झुकवायचे याचा आम्हाला चांगला अभ्यास असल्याचे ते म्हणाले.

उसाला वीज आणि युरियाचे अनुदान दिले जाते. उसाचे भाव ठरवण्यासाठी समिती आहे. वर्षभरात चार बैठका समिती घेते. मात्र विदर्भातील कापूस, धान, सोयाबीनला कुठल्याच सवलती दिल्या जात नाही. हमी भाव ठरविताना उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही, असेही तुपकर यांनी सांगितले. हे सरकार बोलघेवडे आहे. घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात काहीच देत नाही. या सरकारचे विमा कंपन्यांसोबतच साटेलोटे आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचे ऑडिट केल्यास सर्वात मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो, याकडे तुपकर यांनी लक्ष वेधले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये