ताज्या बातम्यारणधुमाळी

“ज्यांनी गोमूत्र शिंपडलं त्यांनी आधी…”, शिंदे गटातील आमदाराचा ठाकरे गटाला खोचक सल्ला

मुंबई | Sanjay Gaikwad On Thackeray Group – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून आता राजकीय वातापरण तापलं असून शिंदे गटातील आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. “ज्यांनी गोमूत्र शिंपडलं त्यांनी आधी मातोश्री पवित्र करा”, असा खोचक सल्ला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिला आहे.

“काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्पर्शानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची मातोश्री अपवित्र झाली”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे. “बाळासाहेब ठाकरे कोणा एकाचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आदर असून एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करायला जाऊ शकतं”, असंही गायकवाड म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी गोमूत्र शिंपडल्याच्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. “बाळासाहेबांनी आयुष्यभर आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार केले आहेत. गद्दारांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. कोणी शिवसेना सोडून गेलं तर अशा आमदारांना रस्त्यात तुडवा असा आदेश त्यांनी याच शिवतीर्थावरून दिला होता. त्यांच्या स्मृतीस्थळावर अशी अमंगल माणसं आल्यानं शिवसैनिकांनी संस्कृतीप्रमाणे गोमूत्रानं ते स्वच्छ केलं आहे”, असं सावंत यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये