ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

त्याला भरचौकात फासावर लटकवा; संजय राऊतांची मागणी

मुंबई | Sanjay Raut – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं देशात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. तसंच या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. यादरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या खून प्रकरणातील मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मारेकऱ्यावर खटले चालवू नका. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भरचौकात फासावर लटकवा”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाजमाध्यामातून ओळखी होतात त्यातून अशी भयंकर नाती निर्माण होतात. ही मुलं कोणत्या धुंदीत आणि गुंगीत जगत आहेत, हे आज परत एकदा समजलं आहे. श्रद्धाचा खून विकृतीच्या पुढचं पाऊल आहे. या खून प्रकरणात राजकारण बंद केलं पाहिजे. यात राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांचा, कुटुंबाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे”, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला यानं गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबनं मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी आफताबला पोलिसांनी अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये