ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

मैदानात उतरताच संजय राऊतांनी फोडली डरकाळी; म्हणाले,”आता मी पुन्हा…”

मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्याप्रकरणी ते अटक होते. त्यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांचे प्रत्येकवेळी अर्ज फेटाळण्यात आले होते. तसंच आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कार्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच संजय राऊत यांच्या परतण्यानं शिवसेनेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यादरम्यान, मैदानात उतरताच राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता. न्यायदेवतेचे मी आभार मानतो. आता मी पुन्हा लढेन, मी कामाला पुन्हा सुरूवात करेन”, असा आत्मविश्वास राऊतांनी जामीन मिळाल्यानंतर व्यक्त केला आहे. तसंच संजय राऊतांचा जामीन मंजूर होताच कोर्ट रूमबाहेर टाळ्यांचा कडकडाटही झाला.

दरम्यान, संजय राऊतांना जामीन मिळताच ईडीला मोठा धक्का बसला होता. ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली होती. मात्र, कोर्टाने मागणी फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच संजय राऊत आज (9 नोव्हेंबर) संध्याकाळीच तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये