पुणेफिचरफुड फंडाराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

इडलीप्रेमींच्या पसंतीचे श्री इडली सेंटर

डली हा पदार्थ खायला हलकाफुलका आणि चविष्ट. त्यालाच सांबर आणि चटणीची सोबत असल्यामुळे खायची मजा वेगळीच. त्यामुळे इडली हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. इडली हा असा पदार्थ आहे जो हलकाफुलका आणि आरोग्यासाठी देखील उत्तमच. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला इडलीचा आस्वाद घ्यायला आवडतंच. तसेच खवय्ये हे नाष्टा करण्यासाठी गेले किंवा कुठे बाहेर फिरायला गेले तर इडलीचा आस्वाद न विसरता ते घेतातच. तर अशाच इडली प्रेमींसाठी श्री इडली सेंटर प्रसिद्ध आहे.

श्री इडली सेंटर हे राहुल माने यांचं आहे. हे इडली सेंटर खवय्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. श्री इडली सेंटरची स्पेशल इडली सांबर, इडली चटणी, फ्रेंची फ्राइड इडली, व्हेजी इडली, चीली इडली, पंजाबी इडली, शेजवान इडली, मसाला डोसा, उत्तपा, कट डोसा, लोणी स्पंज डोसा असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत. विशेष म्हणजे श्री इडली सेंटरने त्यांच्या पदार्थांची कायम ठेवलेली चव हीच त्यांची प्रसिद्धी आहे. त्यामुळे खवय्ये मोठ्या प्रमाणात तेथे येतात. तसेच या इडली सेंटरमध्ये बसण्यास प्रशस्त जागा आणि सेंटर मध्ये केलेली आकर्षक रचना त्यामुळे इडलीप्रेमी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात.

श्री इडली सेंटरचे आदरातिथ्य आणि त्यांनी खवय्यांना खाऊ घातलेले नवनवीन चविष्ट पदार्थ यामुळे खवय्यांना या सेंटरने चांगलीच भुरळ घातली आहे. तसंच श्री इडली सेंटर हे चंद्रकांत रेसिडेन्सी, नवले हॉस्पिटल शेजारी, खडकेनगर, न-हे, पुणे येथे आहे. तर तुम्हालादेखील नवनवीन प्रकारच्या स्वादिष्ट इडली आणि अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून श्री इडली सेंटरला भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये