आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी आता एसआयटी करणार
Disha Salian Death Case | माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची (Disha Salian Death Case) चौकशी आता एसआयटी करणार आहे. याप्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
याप्रकरणी राज्य सरकारनं पोलिसांना लेखी आदेश दिले आहेत. तर आता दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सरकारनं एसआयटी तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता एसआयटीचं काम सुरू होणार आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात आहे. त्यामुळे एसआयटीची स्थापना झाल्यानं आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा तपास उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव करणार आहेत.