इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

मोठी बातमी! स्पेनचा फुटबाॅलपटू सर्जिओ रामोसची निवृत्तीची घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबाॅलला केला अलविदा

Sergio Ramos Retirement | स्पेनचा (Spain) फुटबॉलपटू सर्जिओ रामोसनं (Sergio Ramos) आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला आहे. त्यानं निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. संघाचे नवीन व्यवस्थापक लुईस डे ला फुएन्टे यांच्याशी झालेल्या फोन कॉलनंतर सर्जिओ रामोसनं निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे सर्जिओच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. स्पेनच्या विश्वचषक आणि युरो विजेत्या संघांचा भाग असलेला सर्जिओ रामोस हा ‘ला लीगा’मध्ये रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व करत होता.

सर्जिओ रामोसनं निवृत्तीची घोषणा करताना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं आहे की, “आमच्या लाडक्या राष्ट्रीय संघाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. मला आज सकाळी विद्यमान प्रशिक्षकांचा कॉल आला. यावेळी त्यांनी संघातून वगळल्याची माहिती मला दिली.”

माजी प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी सर्जिओ रामोसला राष्ट्रीय संघातून वगळलं होतं. मार्च 2021 पासून तो संघात दिसला नव्हता. त्यानंतर स्पेन संघाचे नवीन व्यवस्थापक लुईस दे ला फुएन्टे यांनीही रामोसला संघातून वगळण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे रामोसने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/SergioRamos/status/1628800510533767170

2005 मध्ये सर्जिओ रामसने स्पेनच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलं होतं. तो 180 वेळा खेळला आणि 2010 मध्ये विश्वचषक आणि 2008 आणि 2012 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला युरो 2020 आणि 2022 विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं होतं. मोरोक्कोविरुद्धच्या संघाच्या धक्कादायक पराभवामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये