ताज्या बातम्यारणधुमाळी

“सच्चा शिवसैनिक कधीही खोटी कागदपत्रे सादर करणार नाही”

कोल्हापूर | Sanjay Mandlik On Thackeray Group – शिंदे गटातील खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. मुंबईत पाच हजार बनावट प्रमाणपत्रे मिळून आली आहेत. कोणत्याही गटाची प्रतिज्ञापत्रे असू देत, ती तपासली पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं सच्चा शिवसैनिक कधीही खोटी कागदपत्रे सादर करणार नाही. खोटी कागदपत्रे सादर करणं हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं माझ्यासारख्या शिवसैनिकाला वाटतं. ज्यांनी आपल्याला समर्थन मिळत नाही म्हणून जर का भाडोत्री लोकांची प्रतिज्ञापत्र दिली असतील तर त्याचा तपास तपास यंत्रणा करेल, असं संजय मंडलिक म्हणाले.

“ढाल-तलवार शौर्याचं प्रतीक आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांचं ढालीने रक्षण करणं आणि जे खोटे वार होत आहेत, गद्दार-गद्दार म्हणून हिणवले जात आहे त्याविरोधात ही तलवार चालविणे, यासाठी प्रतीक म्हणून ढाल-तलवार आहे. चिन्हाबाबत पूर्ण निकाल होईल त्यावेळी धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मिळेल, अशी खात्री आहे”, असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, “‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे शिंदे गटाला नाव देण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे हे बाळासाहेब नेमके कोण, असा सवाल करणाऱ्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली असून शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे हे जगजाहीर असताना हा गैरसमज पसरविणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं”, असंही मंडलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये