अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

टाटा ग्रुपमध्ये मोठ्या बदलांचे संकेत; ‘या’ 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

TATA Group Big Changes : भारतीय उद्योग (Business News) जगतामध्ये मागील कैक वर्षांपासून मोलाचं योगदान देत देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये हातभार लावणाऱ्या उद्योगसमुहांमधील एक नाव म्हणजे टाटा समुह. फक्त उद्योगच नव्हे, तर समाजसेवा आणि तत्सम इतर क्षेत्रांमध्येही या समुहाकडून सिंहाचा वाटा घेतल्याचं कायमच पाहायला मिळालं. आता याच उद्योग समुहामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असून, त्या बदलांसाठी रितसर मान्यताही मिळाली आहे. त्यामुळं या बदलांचीच सध्या उद्योग जगतामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.

टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Steel Long Products Ltd) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटी (NCLT) कडून टाटा स्टील लिमिटेडच्या विलिनिकरणास मान्यता मिळाली आहे. टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्ससोबतच इतर सहा कंपन्यांचंही विलिनीकरण होणार आहे. म्हणजेच एकूण सात कंपन्यांचं विलिनीकरण आता होणार आहे.

टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्सकडून शेअर बाजारात देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटीच्या कटक पीठनं 18 ऑक्टोबर रोजीच टाटा स्टीलसोबतच्या विलिनीकरणास मान्यता दिली असून याच वर्षभरात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे.

टाटा स्टीलचे सीईओ आणि कार्यकारी संचालक टीवी नरेंग्रन यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांची विलिनीकरण प्रक्रिया 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण होईल. या विलिनीकरण प्रक्रियेत टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स, टाटा मेटालिक्स, टीआरएफ, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, इंडियन स्टील एंड वायर प्रोडक्ट्स, टाटा स्टील माइनिंग आणि एस एंड टी मायनिंगचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये