ख्रिस्ती समाजाला विधानसभेत स्थान मिळावे; बिशप थॉमस डाबरे
पुणे | Christian Society : ख्रिस्ती समाजाचे (Christian Society) न्याय्य हक्क आणि प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी बिशप थॉमस डाबरे (Bishop Thomas Dabre) यांनी केली. रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्यावतीने पाचवी ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत बिशप डाबरे यांनी ख्रिस्ती समाजाच्या मागण्या मांडल्या. अध्यक्षस्थानी बिशप ॲन्ड्रू राठोड होते.
ख्रिश्चनांचे हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली असून ती भारतीय संविधानावर आधारित आहे, असे परिषदेचे संयोजक प्रशांत केदारी यांनी सांगितले.
परिषदेला ख्रिस्ती समाजाचे नेते विजय बारसे, प्रविण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डांबले, जमात ए इस्लामचे झुबेर मेमन, आम आदमी पार्टीचे विजय कुंभार आणि सुदर्शन जगदाळे, ख्रिश्चन फोरमचे राजेश केळकर, फादर जो गायकवाड, युक्रांदचे संदीप बर्वे, सिस्टर आर केंजळ, रेंजहिल यूथचे सुधीर हिवाळे, मेरी पारखे, मार्कस पंडित, पास्टर डॅनियल, अंतोन कदम, सलामी तोरणे, प्रमोद पारधे, जॉन फर्नांडिस, अल्फान्सो रेफेन्स, फेबियन सॅमसंग, अलिस लोबो, जॉन मानतोडे आदी उपस्थित होते.