पुणेफुड फंडा

चटपटीत पदार्थांच्या मेजवानीसाठी वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटर

पाणीपुरी, भेळ असे चटपटीत पदार्थ म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय काही राहत नाही. तसेच हे चाटचे पदार्थ मुलींना जास्त आवडतात असं म्हणतात. पण आजकाल पाणीपुरी सारखे चटपटीत पदार्थ फक्त मुलींनाच नाही तर लहान मुले, ज्येष्ठ लोकं असं प्रत्येकालाच खायला आवडतात. तर असे खवय्ये एखाद्या प्रसिद्ध चाट सेंटरच्या शोधात असतात. तर अशाच पाणीपुरी प्रेमींसाठी वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटर प्रसिद्ध आहे.

वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटर हे विजय जाधव यांचं आहे. हे प्रसिद्ध स्नॅक्स सेंटर हे साई गणेश सोसायटी गणेशनगर, कर्वेनगर, पुणे येथे आहे. वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटरमध्ये खवय्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. विशेष म्हणजे या स्नॅक्स सेंटर मधील पदार्थ हे स्वच्छ भाज्या आणि पदार्थ वापरुन बनवले जातात. तसेच त्यांचं आदरातिथ्य पुणेकरांसोबतच बाहेरून पुण्यात येणाऱ्या खवय्यांना देखील आकर्षित करते.

वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटरची स्पेशल पाणीपुरी, मसाला पुरी, शेवपुरी, दहीपुरी, एसपीडीपी, रगडा पुरी, मटकी भेळ, ओली भेळ, सुकी भेळ, बॉम्बे भेळ, ग्रील्ड सॅण्डवीच, चीज सॅण्डवीच असे अनेक चटपटीत पदार्थ त्यांची खासियत आहेत. तसेच या स्नॅक्स सेंटरमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून प्रत्येकाच्याच खिशाला परवडतील याच दरात मिळतात.

त्याचबरोबर वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटरने त्यांच्या पदार्थांची चव ही दर्जेदार आणि अस्सल ठेवल्याने या स्नॅक्स सेंटरला खवय्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर तुम्हालाही चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून वैष्णवी भेळ आणि पाणीपुरी स्नॅक्स सेंटरला भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये