Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

विक्रम गोखलेंकडून कलाकारांसाठी ५ कोटींची जमीन दान

पुणे : आपल्या चार पिढ्यांच्या कलाक्षेत्रातील वर्षाचे स्मरण ठेवून सेवानिवृत्त चित्रपट कलाकारांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी त्यांच्या निवासासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज तब्बल पाच कोटी रुपयांची मुळशी येथील जमीन दान दिली सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या दानपत्राची कागदपत्रे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी लेखक व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे अभिनेते व निर्माते प्रवीण तरडे, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, अभिनेते सुरेश विश्वकर्मा वैभव जोशी अनिल उर्फ अण्णा गुंजाळ आदी उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये विक्रम गोखले यांनी आपल्या हालअपेष्टांचे आणि वडिलोपार्जित अभिनय क्षेत्रातील समस्यांचे कथन केले. ते म्हणाले की अवघ्या दीडशे रुपयात सिनेमा करणारे माझे वडील चंद्रकांत गोखले आणि माझ्या पणजी आजी या सर्वांच्या प्रेरणेने मी हा निर्णय घेतला आहे.

हा आमचा मुळशी पॅटर्न
आपल्या स्वतःच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जेष्ठ कलासाठी कुठल्याही अटी-शर्तीशिवाय दान देणे हा आमचा
‘मुळशी पॅटर्न’ आहे, हे फक्त येथेच – मराठी चित्रपटसृष्टीतच घडू शकते. अशा शब्दात प्रवीण तरडे यांनी विक्रम गोखले यांचा गौरव केला.

मेघराज राजेभोसले विश्वस्त
अनेक चित्रपट कलाकार विषयक संघटनांसोबत काम करत असलो तरी मला या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी देण्यासाठी मेघराज राजे भोसले यांचे खांदे समर्थ आणि विश्वासू वाटले, असे गोखले यांनी सांगितले. मराठी चित्रपट महामंडळ हा संपूर्ण प्रकल्प अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करेल आणि हजारो कलाकारांना यामुळे हक्काचा निवारा उपलब्ध होईल, यासाठी राजे भोसले हे अत्यंत विश्वासू ‘विश्वस्त’ म्हणून काम पाहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबईतील कूपर हॉस्पिटलजवळ एका सिग्नलवर भेटलेला भिकारी न्याहाळून पाहिल्यानंतर, तो चित्रपट क्षेत्रातील एक ज्येष्ठ मान्यवर होता हे पाहून माझे मन द्रवले आणि मी हा निर्णय घेतला. असे गोखले म्हणाले. यावेळी निर्माते, अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले की, या जागेवरती चांगले बांधकाम करून १६ मनोरंजन केंद्र निवासी केंद्र रंगमंच उभा करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये