क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

मुंबई-दिल्ली भिडणार! महिला प्रिमीयर लीगच्या विजेतेपदासाठी काटें की टक्कर

मुंबई : (WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians) महिला प्रीमियर लीग २०२३चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रविवारी लीगला पहिला चॅम्पियन मिळेल. या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने असतील.

या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ पैकी ६-६ सामने जिंकले. दिल्लीचा नेट रनरेट चांगला होता आणि त्यामुळेच त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

आज होणाऱ्या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि दिल्ली दोन्ही तगडे संघ आमनेसामने आले असल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणं फिटणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये