तुमच्या खिशावर होणार परिणाम; ‘या’ 8 बँकांनी बदलले त्यांचे व्याजदर
Interest Rates | आता सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. कारण अनेक बँकांनी त्यांच्या भांडवली खर्चावर आधारित व्याजदर आणि रेपोदराशी संलग्न कर्ज दर बदलले आहेत. बँकांनी केलेल्या या बदलांमुळे सर्वसामान्य जनतेच्या कर्जाच्या ईएमआयमध्येही बदल दिसून येत आहे.
डिसेंबरच्या या महिन्यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, ICICI बँक, बंधन बँक, पंजाब नॅशनल बँक या 8 बँकांनी त्यांचे व्याजदर बदलले आहेत. या बँकांनी त्यांच्या MCLR आणि RLLR मध्ये बदल केले आहेत.
1 डिसेंबर 2023 पासून पंजाब नॅशनल बँकनं (PNB) त्यांच्या MCLR मध्ये बदल केले आहेत. एका दिवसासाठी सुधारित MCLR 8.3 टक्के आहे. तर एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.25 टक्के आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 8.35 टक्के आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर 8.55 टक्के आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी PNB चा MCLR दर 8.65 टक्के आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा दर 9.95 टक्के आहे.
ICICI बँकेने 1 डिसेंबर 2023 पासून आपला MCLR बदलला आहे. एका दिवसासाठी दर 8.5 टक्के आहे. एका महिन्यासाठी MCLR आधारित कर्जाचा दर 8.5 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.55 टक्के आहे. सहा महिन्यांचा दर 8.9 टक्के आहे. एक वर्षाचा दर 9 टक्के आहे.
11 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MCLR दर प्रभावी आहेत. एका दिवसासाठी दर 7.9 टक्के आहे. एका महिन्याचा MCLR 7.95 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.25 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.6 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 8.8 टक्के आहे. दोन वर्षांचा MCLR 8.9 टक्के आहे. तीन वर्षांचा MCLR 9.05 टक्के आहे.
1 डिसेंबर 2023 पासून बँक ऑफ इंडियाने आपल्या MCLR मध्ये सुधारणा केली आहे. एका दिवसासाठी सुधारित दर 7.95 टक्के होते. एका महिन्याचा MCLR दर 8.25 टक्के आहे. बँक ऑफ इंडियाच्या कर्जदारांसाठी तीन महिन्यांचा MCLR 8.25 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.4 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.6 टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR 9 टक्के आहे.
1 डिसेंबर 2023 पासून बंधन बँकेने त्यांचे MCLR आधारित कर्ज दर बदलले आहेत. एका दिवसासाठी आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 7.07 टक्के आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर 8.57 टक्के आहे. एक, दोन आणि तीन वर्षांचा MCLR दर 11.32 टक्के आहे.
12 डिसेंबर 2023 पासून बँक ऑफ बडोदाने त्यांचा MCLR बदलला आहे. एका दिवसासाठी MCLR 8 टक्के आहे. एका महिन्याचा MCLR 8.3 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.4 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.55 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 8.75 टक्के आहे.
12 डिसेंबर 2023 पासून कॅनरा बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे MCLR दर बदलले आहेत. एका दिवसासाठी दर 8 टक्क्यांवर आले आहेत. एका महिन्याचे कर्जाचे दर 8.1 टक्के, तीन महिन्यांचे कर्जाचे दर 8.2 टक्क्यांवर आले आहेत. सहा महिन्यांसाठी कर्जाचा दर 8.55 टक्के आहे. एक वर्षाच्या कर्जाचा दर 8.75 टक्के आणि दोन वर्षांच्या कर्जाचा दर 9.05 टक्क्यांवर आला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जाचा दर 9.15 टक्के ठेवला आहे. कॅनरा बँकेने RLLR मध्येही बदल केले असून, 12 डिसेंबरपासून ते 9.25 टक्के करण्यात आले आहे.
IDBI बँकेनं एका दिवसासाठी कर्जाचा दर 8.3 टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.45 टक्के आहे. तीन महिन्यांचा MCLR दर 8.75 टक्के दिला आहे. तर सहा महिन्यांचा MCLR 8.95 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 9 टक्के आहे.
दोन वर्षांसाठी MCLR 9.55 टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR 9.95 टक्के आहे.