इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

“मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही…”, भाजप आमदाराचा बजरंग पुनियावर हल्लाबोल

मुंबई | Bajrang Punia : भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं (Bajrang Punia) आपला पद्मश्री पुरस्कार परत केला. बजरंग पुनियाने साक्षीच्या समर्थनात पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरील फूटपाथवर ठेवला. त्यामुळे आता भाजपनं बजरंग पुनियावर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी बजरंग पुनियावर टीका केली आहे. तसंच अतुल भातखळकर यांनी ट्विट करत बजरंग पुनियाचा तीव्र निषेध केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, इतिहास याद रखेगा…पद्मश्री पुरस्कार फूटपाथवर ठेवणे हा समस्त भारतीयांचा, भारत सरकारचा व देशाचा अपमान आहे. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित. मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध.

दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप असतानाच आता त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर भारताच्या पदक विजेत्या महिला पैलवान साक्षी मलिका आणि विनेश फोगाट यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये