क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

हार्दिक पांड्याच्या करिअरला ब्रेक! टीम इंडियाला फटका, मुंबई इंडियन्सला देखील जबरी झटका..

नवी दिल्ली : (Career of Hardik Pandya) हार्दिक पांड्याच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे केवळ त्याचेच नाही तर टीम इंडियाला देखील एक अष्टपैलू खेळाडू बाहेर असल्याने झटका बसला आहे, मुंबई इंडियन्सला देखील जबरी फटका बसणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, ताज्या माहितीनुसार तो अफगाणिस्तान मालिका आणि आयपीएल 2024 चा हंगाम खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हार्दिक पांड्या अजून घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्याला आणखीन काही दिवसांच्या विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. त्यानंतर लिलावापूर्वी हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल आणि तो 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल अशी घोषणा केली. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये