आवळ्याचा रस आहे गुणांचा खजिना! उपाशीपोटी पिल्यास होतात अफलातून फायदे..
Benefits of amla juice : औषधीय गुणांनी युक्त असणारा आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. अनादी काळापासून आवळ्याचा वापर करण्यात येत आहे. पोषक तत्वांनी युक्त असणाऱ्या आवळ्याच्या फळामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे जो तुमच्या संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो. यामुळेच आवळ्याचा रसाचा तुमच्या नियमित आहारात समावेश करून घेतल्यास, आरोग्याला फायदा मिळतो. तुम्हालाही आवळ्याच्या रसाचे फायदे माहीत नसतील तर हा लेख नक्की वाचा.
पचनासाठी उत्तम : तुम्हाला सतत पचनासंबंधित समस्या असतील तरत आवळ्याच्या रसामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. तसंच अपचन, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या रोखण्यास आवळ्याच्या रसामुळे फायदा होतो. तुम्ही नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास, पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत : विटामिन सी युक्त असणारा आवळा आपल्या अँटीऑक्सिडंट्स गुणांसाठी ओळखला जातो. रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस पिण्यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते, ज्यामुळे संक्रमणाशी लढा देण्यास ताकद मिळते आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्याला उर्जा मिळते.
रक्तातील साखरेची पातळी राखते : तुम्ही जर डायबिटीस रूग्ण असाल तर मधुमेही व्यक्तींसाठी आवळ्याचा रस हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस पिण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शुगर नियंत्रणात राहाते. तसंच डायबिटीसची लक्षणे यामुळे कमी होण्यासाठी फायदा होतो.
सांधेदुखीपासून सुटका : आवळ्यामधील अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि जुन्या त्रासापासूनही सुटका मिळते. रोज सकाळी उपाशीपोटी रसाचे सेवन केल्यास, सांधेदुखी आणि आलेली सूज कमी होऊन तुम्हाला त्रास कमी होतो. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी याचा उपयोग करून घ्यावा.
हृदय होते निरोगी : आवळा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदय निरोगी करण्यास मदत करते. हृदयासंबंधित आजार अथवा जोखीम कमी करण्यासाठीही याचा फायदा करून घेता येतो. आवळ्यात असणारे फायबर आणि पॉलिफेनोल्ससारखे अँटीऑक्सिडंट्स हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.