ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी अन् वळसे पाटलांनी…”, अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar On Amol Kolhe | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, अशी अप्रत्यक्ष टीका अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर केली आहे. तसंच आम्ही अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, एक खासदारानं आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. मी त्या खासदाराला उमेदवारी दिली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. त्यांचं आता चाललंय सगळं. पण त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्षही नव्हतं. ते मतदारसंघात फिरतही नव्हते.

अमोल कोल्हेंना उमेदवारी देताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम कलाकार आहेत, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. त्यांच्या भूमिकेनं महाराष्ट्रातील जनतेला खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. पण काळजी करू नका, मी आज सांगतो की, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी निवडून आणून दाखवेल, असंही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये