ताज्या बातम्यादेश - विदेश

खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच; लोकसभेतून आणखी 3 खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली | Opposition MPs Suspended : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मागील काही दिवसांपासून खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू आहे. आताही लोकसभेतून आणखी 3 खासदारांचं निलंबन (Suspended) करण्यात आलं आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी काँग्रेसच्या तीन खासदारांचं निलंबन केलं आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे खासदार डीके सुरेश, नकुलनाथ आणि दीपक बैज यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांची संख्या 146 वर येऊन पोहोचली आहे. यामध्ये लोकसभेच्या 100 खासदारांचा समावेश आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर तीन खासदारांची नावं घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात आहे, असं अध्यक्षांनी सांगितलं.

लोकसभा अध्यक्षांनी विरोधी सदस्यांवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, मला विनाकारण कोणत्याही सदस्याला निलंबित करायचं नाही. तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. तुम्हा सर्वांना इथे चर्चा करण्याचा आणि तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण ही पद्धत योग्य आहे का? ही सभागृहाची प्रतिष्ठा आहे का? हे योग्य नसल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये