संजूचे दमदार शतकी खेळी! रिंकूनेही दिले तडाखे, आफ्रिकेसमोर 297 धावांचे आव्हान
बोलँड : (India vs South Africa 3rd ODI) वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले आहे. पार्ल येथील बोलँड पार्क स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर संघाने फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 296 धावा केल्या.
यष्टिरक्षक संजू सॅमसनने 114 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. संजूचे हे वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. टिळक वर्माने 52 धावांची खेळी त्याला साजेशी साथ दिली. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. तर रिंकू सिंगने 27 चेंडूत 38 धावांची खेळी करत पारीचा शेवट केला.
बायरन हेंड्रिक्सने 3, तर नांद्रे बर्जरने 2 बळी घेतले. वेन मुल्डर, केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर संजू सॅमसनने महत्त्वाची खेळी खेळली. त्याने केएल राहुलसोबत 52 आणि टिळक वर्मासोबत शतकी भागीदारी करत धावसंख्या 200 च्या पुढे नेली.