ताज्या बातम्यादेश - विदेश

राजस्थानमध्येही भाजपचे धक्कातंत्र; भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

जयपूर | Rajasthan New CM : राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या (Rajasthan New CM) नावाची घोषणा करण्यात आली आहे. सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. प्रदेश कार्यालयात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजप हायकमांडने ठरवलेले नाव जाहीर करण्यात आले आहे.

राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्सही मंगळवारी संपला. मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा आश्चर्यकारक नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. यासोबतच छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजपने मुख्यमंत्रीपदी निवड केली.

विष्णुदेव साय बुधवारी रायपूर येथील विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी सांगितले की, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १३ डिसेंबर रोजी होणार आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने आश्चर्यकारकपणे नवीन चेहऱ्यांची निवड केली. कारण मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात चर्चेत होती, मात्र भाजपने इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायातील मोहन यादव यांची निवड केली.

छत्तीसगडमध्ये पक्षाने आदिवासी नेते विष्णुदेव साय यांनी बाजी मारली. माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांची नावे येथे चर्चेत होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. हे सर्व पाहता तिन्ही राज्यात भाजपचे धक्कातंत्र दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये