ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अजितदादांनी उचलला मराठी माणसाचा मुद्दा; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

मुंबई : (Ajit Pawar On Raj Thackeray) दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील गुजराती सोसायटीत एका मराठी महिलेला मुंबईत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. शिवसेना, मनसेने या प्रकाराचा निषेध केलाच आहे, त्यात या वेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे. याद्वारे राज ठाकरे यांच्यावर मात करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यभरात आपला पाया मजबूत करण्याची तयारी अजित पवार यांनी सुरू केली आहे.

एका मराठी माणसाने मुलुंडमधील एका गुजराती सोसायटीत कार्यालयासाठी जागा पाहिली होती. सोसायटीने मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर मराठी माणसाला आमच्या सोसायटीत परवानगी नाही, असे सांगत महिलेला दमदाटी केली. या मराठी महिलेने समाजमाध्यमांत व्हिडिओ व्हायरल करून आपली व्यथा मांडली. त्यानंतर मनसेने संबंधित सोसायटीच्या व्यवस्थापनाला हिसका दाखवल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकाराचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनपेक्षितपणे यात उडी घेतली. राज्यात कोठेही मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. अशा प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येईल. छत्रपती शिवरायांच्या भूमीत असे प्रकार होत असतील तर ती लाजिरवाणी बाब आहे, असे सांगत त्यांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये