राष्ट्रसंचार कनेक्ट

बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला

पुलाच्या कामाची चौकशी करण्याची सूचना : एक मोरी वाढवा

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बुवासाहेब ओढ्याला आणखी एक मोरी वाढविणाची सूचना करणार असून पुलाच्या कामास उशीर का लागतोय? या कामाची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करणार आहे. बुवासाहेब ओढ्यावरील पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पुरंदरचे आ. संजय जगताप यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील नीरा- शिवतक्रार, पिंपरेखुर्द, थोपटेवाडी येथे मंगळवारी मध्यराञी झालेल्या ढगफुटीने शेती, पोल्ट्री व घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या भागाची पाहणी पुरंदरचे आ. संजय जगताप यांनी रविवारी (दि. ११) केली. यावेळी नीरा येथील बुवासाहेब ओढ्याची पाहणी करताना ते बोलत होते.

यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, युवक कॉंग्रेसचे महासचिव गणेश जगताप, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, चंदरराव धायगुडे, ग्रा. पं. सदस्य संदीप धायगुडे, अनंता शिंदे, धनंजय काकडे, दीपक काकडे, विजय शिंदे, सूर्यकांत कांबळे, जावेद शेख, सतीश पवार, राजेंद्र बरकडे, कल्याण जेधे, राजेंद्र दगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मीना लकडे, अनिता हरिहर या महिलांनी ओढ्याच्या पुराचे पाणी घराला लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ओढ्याच्या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, तसेच सर्व्हिस रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आ. संजय जगताप यांच्याकडे केली. तर वैशाली राजेंद्र निगडे यांनी नीरा-गुळूंचे रोडवर पडलेल्या खडीमुळे अपघात होत असल्याचे आ. संजय जगताप यांचे लक्ष वेधले.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी बैठक घेणार असून ओढ्याच्या पुलाच्या कामाची चौकशी करणार आहे. तसेच ढगफुटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे तातडीने करण्याची सूचना पुरंदरच्या तहसीलदारांना केली आहे.
— आ. संजय जगताप

बुवासाहेब ओढ्याला प्रचंड मोठा पुराच्या पाण्यामुळे ओढ्याच्या बाह्यवळणावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थी, दूधवाले, शेतकरी यांची गैरसोय झाली होती. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे यांच्याशी संपर्क साधून तातडीने ओढ्याच्या बाह्यवळणावरील वाहतूक सुरू करण्याकरिता पाठपुरावा केला. त्यामुळे गेली दोन दिवसांपासून सा. बां. विभागाने ओढ्यावरील बाह्यवळणावर मुरुम व दगड यांचा भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला आहे.
— राजेश काकडे, उपसरपंच, नीरा – शिवतक्रार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये