देश - विदेश

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना लावले वेड; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ‘वेड’च्या पोस्टरचे अनावरण केले.

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत. तसेच, विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.

प्रदर्शन तारीख

आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे. ३० डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये