ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

Breaking News : फडणवीसांना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात दोषमुक्त

नागपूर | Devendra Fadnavis – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक शपथपत्र प्रकरणात दोषमुक्त झाले आहेत. फडणवीसांविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरूपाते होते. तसंच ते गुन्हे लपवले तरीही त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्यानं फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. या सुनावणीसाठी फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते.

2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करीत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 5 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता, तर आज शुक्रवार 8 सप्टेंबरला तो जाहीर केला. यासंदर्भात ॲड. सतीश उके यांनी या प्रकरणात फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती.

दरम्यान, यापेक्षाही गंभीर गुन्ह्यांची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. पण केवळ नजरचुकीने दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे राहून गेले, असा युक्तिवाद फडणवीसांच्या वकिलांनी केला होता. तर आता फडणवीसांना दिलासा मिळाला असून ते निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणात दोषमुक्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये