ताज्या बातम्यामनोरंजन

बच्चे कंपनीमध्ये अॅनिमेटेड मूव्हीजची क्रेझ

भारतात भारतीय कथानकांवर अॅनिमेटेड मूव्हीज आल्या आणि भरपूर चालल्या देखील. घरात लहान मुले असतीलत तर ही लिस्ट सुटीच्या दिवसांसाठी तुम्हाला कामी येईल.

लहान मुलांना कार्टून पाहायला मोठ्या प्रमाणात आवडते. त्यामुळे आजकालची लहान मुलं दिवस-रात्र कार्टून चॅनल बघताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे मुलं जे कार्टून्स पाहत असतात त्यामध्ये असलेले कॅरेक्टर एखाद्या सुपर हीरोप्रमाणे ते मुलांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लहान मुले कार्टून्स शोला पसंती देताना दिसतात. त्यात अॅनिमेटेड मूव्हीज (Animated Movies) तर लहान मुले अगदी मन लावून पाहत असतात. यामध्ये भारतीय अॅनिमेटेड चित्रपट चांगलेच सुपरहिट ठरले आहेत. मग बाल गणेश, रामायण, हनुमान यासारख्या अनेक अॅनिमेटेड चित्रपटांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. तर आता आपण अशाच गाजलेल्या अॅनिमेटेड मूव्हीजबाबत जाणून घेणार आहोत.

हनुमान (Hanuman) – हनुमान हा अॅनिमेटेड चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला लहान मुलांसोबतच ज्येष्ठ लोकांनीही पसंती दिली होती. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीनं पाहिला जातो. हनुमान हा अॅनिमेटेड चित्रपट 2005 सहारा इंडिया परिवाराने काढला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘आसमान को छूकर देखा’ या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती.

image 7 4

बाल गणेश (Bal Ganesh) – बाल गणेश हा अॅनिमेटेड चित्रपट लहान मुलांचा सर्वात आवडता चित्रपट आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये गणपती बाप्पांना बाल रूपात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे. आजही हा चित्रपट लहान मुले आवर्जून पाहत असतात. लहान मुलांसोबतच तरुणाईला देखील या चित्रपटानं भुरळ घातली आहे.

image 7 1

घटोत्कच (Ghatothkach) – घटोत्कच हा चित्रपट लहान मुलांच्या आवडीचा चित्रपट आहे. 2008 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भीम आणि हिडींबाचा मुलगा घटोत्कच यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाला बाल प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

image 7 2

द रिटर्न ऑफ हनुमान (Return Of Hanuman) – हनुमान या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दोन वर्षांनी द रिटर्न ऑफ हनुमान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. पण हा पहिल्या हनुमान चित्रपटाचा सिक्वल नाहीये. तसेच या चित्रपटात हनुमानाचं कॅरेक्टर तेच होतं, पण त्यातील कथा थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली होती.

image 7 3

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये