इतरक्रीडाताज्या बातम्या

रोनाल्डोला डच्चू, बॅलोन डी’ओर पुरस्कार यादीतून नाव गायब

लंडन | फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित पुरस्कार बॅलोन डी’ओरसाठी ३० संभाव्य नावांची नुकतीच घोषणा करण्यात आली. मात्र, या घोषणेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. तब्बल २० वर्षांनंतर या यादीतून पोर्तुगीज फुटबॉलपटूचे नाव गायब झाले असल्याचे समोर आले असून २००३ नंतर प्रथमच बॅलोन डी’ओरच्या नामांकन यादीत रोनाल्डोला स्थान मिळू शकलेले नाही. यंदाच्या बॅलोन डी’ओर नामांकन यादीत किलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी आणि एर्लिंग हॉलंड या स्टार खेळाडूंनी या आपले स्थान निश्चित केले आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ३० ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये होईल.

रोनाल्डो हा सध्या सौदी अरेबियाच्या अल नासेर क्लबकडून खेळतो. त्याने बॅलोन डी’ओर या प्रतिष्ठीत पुरस्कारावर पाच वेळा नाव कोरले आहे. मँचेस्टर युनायटेड संघाचा भाग असताना २००८ मध्ये तोनाल्डोने पहिल्यांदा बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला होता. २००४ पासून त्याला सलग वीस वर्षे नामांकन मिळाले आहे. यादरम्यान त्याने २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार पटकावला.

२०२२ मध्ये बॅलोन डी’ओर पुरस्काराच्या यादीत मेस्सीचे नाव नव्हते. त्याने हा पुरस्कार ७ वेळा जिंकला आहे. २००९ मध्ये मेस्सीने पहिल्यांदा या पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्येही त्याला बॅलोन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये