ALL OUT: भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा अन् पाकिस्तानचा डाव आवरला दोनशेच्या आत सारा
अहमदाबाद | IND VS PAK : सध्या भारत विरूद्ध पाकिस्तान (IND VS PAK) सामना चांगलाच रंगला आहे. भारतीय संघानं दमदार कामगिरी करत पाकिस्तानला ऑलआऊट (ALL OUT) केलं आहे. दोनशेच्या आतच भारतानं पाकिस्तानचं पॅकअप केलं. त्यामुळे आता विजय मिळवण्यासाठी भारतासमोर 192 धावांचं आव्हान आहे.
भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसंच पाकिस्तानकडून बाबर आझमनं सर्वाधिक 50 धावा केल्या. तर अबदुल्ल्हा शफीकनं 20 धावा केल्या आणि मोहम्मद रिझवान 49 धावांवर आऊट झाला. तर इमाम उल हकनं 36 धावांचं योगदान दिलं. सोबतच हसन अली 12 धावा करून आऊट झाला.
तर आता भारताला विजय मिळवण्यासाठी 192 धावांचं आव्हान पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.