ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

“आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्या”, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची थेट सरकारकडे मागणी

पुणे : (Maharashtra Farmers News) मागील काही वर्षात अस्मानीने संकटाने बारमाही शेती धोक्यात आली आहे. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी यवतामळमधील एका शेतकऱ्याने एका सरकारी अधिकाऱ्याकडे गांजा लागवडीची मागणी केली आहे. मनीष जाधव या कापूस उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्या संघटनेतील काही शेतकऱ्यांच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे यांना निवेदन दिले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. या पारंपरिक पिकापासून त्यांना योग्य परतावा मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकराने आता गांजा लागवडीला अधिकृत मान्यता द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

विभागीय आयुक्त यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक सरकारी अधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. गांजा लागवडीबाबत कायदा स्पष्ट असला तरीही या प्रकरणी निर्णय घेणे राज्यावर अवलंबून आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, गांजा पिकवण्याची आमची मागणी प्रतिकात्मक असून आम्ही आमच्या दुर्दशेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधू इच्छितो असं, कापूस उत्पादस शेतकरी मनिष जाधव म्हणाले. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे यवतामळ जिल्हा उद्ध्वस्त झाला आहे. तर नोव्हेंबमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखीच भर पडली. परंतु, सरकारी मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत आगाऊ रक्कमही नाकारण्यात आली आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये