ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पुणे विद्यापीठात जोरदार राडा; पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन संघटना एकमेकांना भिडल्या

पुणे | Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) जोरदार राडा झाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. त्यामुळे भाजप युवा मोर्चानं (BJP Yuva Morcha) आक्रमक होत या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला आहे.

पुणे विद्यापीठ परिसरात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निर्दशनं केली. यादरम्यान त्यांची एसएफआयच्या विद्यार्थ्यांसोबत बाचाबाची झाली. तर दोन्ही संघटना आमनेसामने आल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पुणे विद्यापीठ परिसरात दोन्ही संघटनांमध्ये रा़डा झाल्यामुळे पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग्स काढण्यात आली होती. तसंच आक्षेपार्ह मजकूर देखील लिहिण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवला. सोबतच अभाविपनेही या घटनेचा निषेध नोंदवला होता.

या घटेनबाबत विद्यापीठानं तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा इशारा अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये