पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्याच्या वडीलांचं झालं निधन
मुंबई | Pankaj Tripathi Father Passed Away – प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे ‘OMG 2’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. अशातच आता पंकज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. हे 98 वर्षांचे होते. वडीलांच्या निधनानं पंकज यांना मोठा धक्का बसला आहे.
पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन आजाराने झालं की वृद्धपकाळाने याबाबत अद्याप समजलेलं नाहीये. पंकज त्रिपाठी यांचं त्यांच्या वडीलांसोबत खूप घट्ट नातं होतं. मात्र, आता वडीलांच्या निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पंकज त्रिपाठी हे कामामुळे मुंबईत राहत होते. तर त्यांचे आई-वडील हे बिहारमधील गोपलगंज येथे राहत होते. तसंच पंकज यांच्या वडीलांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सध्या त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यातून शोक व्यक्त करत आहेत.