इतरक्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

Terrorist Rashid Latif: पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा पाकिस्तानात वाजवला गेम; गोळ्या झाडून केली हत्या

कराची | Rashid Latif – भारताचा मोस्ट वाँटेड अतिरेकी आणि पठाणकोट हल्ल्याचा (Pathankot Attack) मास्टरमाइंड शाहिद लतिफ (Rashid Latif) याची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) शाहिद लतिफची हत्या करण्यात आली आहे. शाहिदच्या विरोधात एनआयएनं यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर आता काही अज्ञातांनी शाहिदवर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे.

पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये शाहिद लतिफवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात शाहिदचा जागीच मृत्यू झाला आहे. शाहिद हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. तसंच तो जैश ए मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेमध्ये होता. तो दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यामागे सामील असायचा. तर 12 नोव्हेंबर 1994 रोजी शाहिदला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 16 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्याला वाघा बॉर्डवरून निर्वासित करण्यात आलं होतं.

2 जानेवारी 2016 मध्ये पंजाबच्या पठाणकोट येथे हल्ला झाला होता. 2016मध्ये पठानकोटच्या एअरबसवर हल्ला करण्यात आला होता. तसंच या हल्ल्यात 7 भारतीय जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश ए मोहम्मदनं घडवून आणला होता. तर या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड शाहिद लतिफ होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये