देश - विदेशमनोरंजनशेत -शिवार

पुष्पा २ पुन्हा ब्रेक! शुटींग दरम्यान अल्लू अर्जुनला झाली ‘ही’ इजा

Pushpa 2 Movie Updates : पुष्पाचा पहिला भाग सुपरहिट झाला. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाची भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता लागली आहे. अशातच पुष्पा २ बद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. सिनेमाच्या शुटींगला पुन्हा एकदा मोठा ब्रेक लागलाय. काय झालंय नेमकं? .

सध्या हैदराबाद मधील रामोजी फिल्मसिटीमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द राइजचे शूटींग सुरु आहे. परंतु या शुटींगचे शेड्युल थांबवण्यात आलंय. एका महत्वपूर्ण प्रसंगाचं शुटींग करताना अभिनेता पाठदुखीमुळे हैराण झालाय.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये वजनाने जड असलेल्या पोशाखात अल्लू अर्जून अॅक्शन आणि डान्स सिक्वेन्स शूट करत होता. पण याच पोशाखामुळे अल्लूला पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. अल्लू अर्जुनच्या तब्येतीवर आणखी परिणाम होण्याऐवजी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये