ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

पुण्यात भाजप हॅट्रिक करणार? धंगेकरांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, मोरेंना खासदारकीचं वेढ लागलं..

पुणे : (Pune Loksabha 2024 Political News) दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे काही महिन्यातच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेचा खासदार कोण असेल यासाठी आता सर्वच पक्षातून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांमध्ये विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे पुण्याच्या लोकसभेवर भाजप विजयाची हॅट्रिक करणार हे पाहाणे महत्ताचे ठरणार आहे. मात्र, कसब्याच्या पोटनिवडणुकीचा कौल पाहता पुणे लोकसभेची निवडणूक भाजपसाठी तितकीशी सोपी नसणार. उमेदवार कोण आहे हे भाजपसाठी महत्वाचे ठरणार आहे. भाजप तर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे सुरुवातीपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.

काही महिन्यापुर्वी कसबा पोटनिवडणुकीमध्ये रविंद्र धंगेकर यांच्या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास गगनात मिळाला आहे. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा आहे. रवींद्र धंगेकरांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यात मोहन जोशी यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लोकसभेसाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. मोहन जोशी यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये असली तरी पुण्यातील मनसे फॅक्टर नाकारून चालणार नाही. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. काही दिवसांपुर्वीच वसंत मोरे यांचे भावी खासदार अशा अशायाचे बॅनर लागले होते. त्यामुळे मोरे यांना खासदारकीचे वेळ लागले आहे का? असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये